
वैभववाडी: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या चप्पलफेकीच्या प्रकाराचा वैभववाडीतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथेया कृत्याचा निषेध करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ला झाला.या हल्ल्याचा वैभववाडीत निषेध करण्यात आला.यावेळी ठाकरे शिवसेना कार्यालय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. येथे आल्यावर या त्या घटनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत म्हणाले, “आज देशात सामाजिक व धार्मिक विषमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयावर हल्ला हा लोकशाहीच्या मूळ गाभ्यावर प्रहार आहे. सत्ताधारी या प्रकारावर मौन बाळगून बसले आहेत, ही गंभीर बाब आहे.सुशांत नाईक म्हणाले, “हा केवळ न्यायमूर्तींवर हल्ला नसून बाबासाहेबांच्या संविधानावरचा हल्ला आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचलं पाहिजे.”
यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, तालुका सचिव गुलझार काझी, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, कोळपे विभागप्रमुख जितेंद्र तळेकर, कोकिसरे विभागप्रमुख यशवंत गवाणकर, महिला तालुकाप्रमुख नलिनी पाटील, नगरसेवक मनोज सावंत यांच्यासह महाविकापदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.










