
छ.शिवरायांचे गुरु मौनी महाराज यांच्या संत महात्म्यांवर प्रकाश
सावंतवाडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, आपल्या आध्यात्मिक, सामाजिक कार्यातून जनमाणसांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे सत्पुरुष श्री मौनी महाराज यांच्या अलौकिक जीवनावर प्रकाश टाकणारी कादंबरी इतिहास अभ्यासक प्रा.डॉ.जी.ए.बुवा यांनी संपादीत केली आहे. या 'मौनयोगी' कादंबरीच प्रकाशन नामदेव धामणकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमती गोकुळी रामचंद्र बुवा यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री मौनी महाराज मठ, बाळेघोल येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी श्री मौनी महाराज यांच्या अलौकिक जीवनावर प्रकाश टाकणाच्य कादंबरीचे लेखक डॉ. जी.ए.बुवा यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. जी. ए. बुवा यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली शिवरायांची रणनीती, साधू-संतांवरील नितांत श्रद्धा व संत महात्म्यांवर प्रकाश टाकणारी एक संशोधनपूर्ण ऐतिहासिक कादंबरी "मौनयोगी" आहे असे गौरवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले. यावेळी नामदेव धामणकर, गोकुळी बुवा, डॉ. जी.ए.बुवा, बुवा, धामणकर, पुरीबुवा, गिरी, चौगले, नलवडे व बुवा यांचा मित्र परिवार उपस्थित होता.