
वेंगुर्ला : तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल मातोंडचा निकाल १०० टक्के लागला. यात रती रामचंद्र हरमलकर हिने ४११ गुण (८२.२० टक्के) मिळवत प्रथम क्रमांक, तनिष्का कृष्णा गोसावी हिने ३७९ गुण (७५.८० टक्के) मिळवत द्वितीय तर सहदेव राघोबा सावंत याने ३६६ गुण (७३.२० टक्के) मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, मुख्याध्यापक आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.