
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील एकमेव जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली राजघराण्याच्या स्मशानभूमीतील 'माठ्याची जत्रा मोठ्या दिमाखात संपन्न झाली. राजेसाहेब खेमसावंत तिसरे यांच्या माठ्यात सकाळपासून धार्मिक विधी पार पडले. दुपार पासून दर्शन सुरु करण्यात आले. केळी, नारळ ठेवून सावंतवाडीकर 'राजश्रीं'च्या माठ्यासमोर नतमस्तक झाले.
कोकणात इतर जत्रा या रात्रीच्या भरतात. मात्र, ही जत्रा सकाळी भरते. रात्री या जत्रोत्सवाची सांगता होते. शहरासह आजूबाजूच्या गावातील लोकांनी या जत्रोत्सवास आवर्जून उपस्थिती लावली होती. सावंतवाडी संस्थानच्या वीर वंशजांच स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केल गेल. सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव आहे. राजश्री तिसरे खेम सावंत हे विद्याप्रेमी, विद्येची अभिरुची असलेले एकमेव राजा होते. दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती होती. जत्रोत्सवास खाज्यासह खेळणी, खाद्यपदार्थ, हॉटेलसह दुकान थाटली होती. नागरिकांच्या गर्दीनं माठेवाडा परिसर फुलून गेला होता.











