जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींचा मास्टर स्ट्रोक

वेंगुर्ला - आडेली जि. प.मतदार संघात ठाकरे शिवसेनेला खिंडार
Edited by: दिपेश परब
Published on: October 25, 2025 15:19 PM
views 338  views

वेंगुर्ले : तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी खिंडार पाडले आहे. ठाकरे शिवसेनेचे वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर यांच्या सहित पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात मध्ये प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा हा "मास्टर स्ट्रोक" मानला जात आहे. 

वेतोरे गोगटे मंगल कार्यालयात हे पक्ष प्रवेश संपन्न झाले. यावेळी वायंगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवि दुतोंडकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण उर्फ पपन बंदवलकर, दाभोली ग्रा प सदस्य जया पवार, अर्चना दाभोलकर यांच्यासहित शाखाप्रमुख बाबा पेडणेकर, उपशाखाप्रमुख नैनेश करंगूटकर, महिला शाखा संघटिका सारिका हळदणकर, शाखाप्रमुख प्रकाश सागवेकर, माजी ग्रा प सदस्य अमित दाभोलकर, स्नेहा बोवलेकर, समिधा बांदवलकर,  दादा हळदणकर, दाभोली सोसायटी संचालक श्रीकांत चेंदवणकर, कार्यकर्ते गौतम दाभोलकर, चित्रा माडकर, शुभदा डीचोलकर, शिंदे शिवसेना उपशाखाप्रमुख भूषण प्रभुखानोलकर, वायंगणी ग्रा प सदस्य छाया नांदोस्कर, विद्या कांबळी यांच्यासहित वायंगणी विभाग प्रमुख आनंद दाभोलकर, उपशाखाप्रमुख अमित कामत, युवासेना विभाग प्रमुख हर्षल सातर्डेकर, माजी ग्रा प सदस्य आकांशा दाभोलकर, माजी शाखाप्रमुख सुनील सावंत, महिला पदाधिकारी अश्विनी सावंत, बुथप्रमुख विनायक कामत, करण कांबळी, सोशल मीडियाचे आशुतोष दाभोलकर, तुषार पेडणेकर, खानोली ग्रा. प. सदस्य अमिता खानोलकर, माजी ग्रा प सदस्य सागर रांजणकर यांच्यासहित अंजली मयेकर, संजय खवणेकर, दिलीप आरेकर, तारक हळदणकर, संजय घारे, अनिल हळदणकर, अश्विनी हळदणकर, पूनम नांदोसकर, मठ ग्रा प सदस्य समीर मठकर, प्रथमेश मठकर, मंदार मठकर, राकेश मठकर आदींनी भाजप पक्षात प्रवेश केला.