सावंतवाडीत भव्य रक्तदान शिबीराचं आयोजन

Edited by:
Published on: May 09, 2025 18:51 PM
views 34  views

सावंतवाडी : ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि सार्थक फौंडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि. ११ मे २०२५ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत काझी शहाबुद्दीन हॉल, एस टी स्टॅंडसमोर, सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.  आपल्या जिल्ह्यातील पेशंटसाठी रक्ताची गरज असताना कायम उपयुक्त ठरणारी GMC रक्तपेढी रक्तसंकलन करणार आहे. या रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त म्हणजे शंभर ते सव्वाशेपेक्षा जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावे, असे आवाहन ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि सार्थक फौंडेशन, गोवा यांनी केले आहे. विशेष म्हणजे यावेळी वयस्कर लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीरही आयोजित केले आहे. शिबिराचा सुद्धा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.