श्री स्वामी समर्थ मठ हडपिड इथं गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 11, 2025 13:23 PM
views 76  views

देवगड : देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे  गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व सस्कृति कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे  गुरुपौर्णिमेचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्त सकाळ पासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती.

हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे १० जुलै रोजी ‘गुरुपौर्णिमा उत्सव’ मोठ्या थाटात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमे च्या सोहळ्या निमित्त  १ कोटी पेक्षा जास्त नामजपाचा संकल्प देखील पूर्ण करण्यात आला.जीवनातील सुख-शांती, समाधान,निरोगी आरोग्य, आध्यात्मिक उन्नती आणि संकटमुक्ती यासाठी अनमोल आणि अद्वितीय नामजप संकल्प सोहळा आयोजित करण्यात आला होता.दि. १ जून २०२५ ते ५ जुलै २०२५ (सलग ३५ दिवस) असा  संकल्प कालावधी होता. यामध्ये दररोज आपल्याच घरी २०० पानांची वही घेऊन त्यात लाल पेन घेऊन २२१ वेळा "|| श्री स्वामी समर्थ ||" असे स्पष्ट उच्चार करत जप लिहायचा संकल्प दिला होता. त्यानंतर गुरुपौर्णिमेदिवशी ही नामजप वह्यांचे अर्पण  स्वामी समर्थ महाराज यांच्या अनमोल नामजपाच्या वह्यांचे एकत्रित बंडल करून प्रथम श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी चरणी अर्पण करण्यात आले.त्यानंतर श्री अक्कलकोट समाधी मठात चोळप्पा महाराजांचे सतरावे वंशज वेदशास्त्रसंपन्न अन्नुगुरूजी यांच्या हस्ते महाराजांच्या समाधीजवळ जपवह्यांची मंत्रोच्चार पूजा करून वटवृक्ष देवस्थानात नेण्यात येणार असून 

शेवटी वटवृक्ष स्वामी देवस्थान अक्कलकोट येथे वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष नगरसेवक माजीनगराध्यक्ष.महेश इंगळे यांच्या उपस्थितीत वटवृक्ष देवस्थानात अर्पण करण्यासाठी महेशर इंगळे यांच्या स्वाधीन करन्यात येणार असल्याबद्दल सचिव अक्कलकोट भूषण  नंदकुमार तु. पेडणेकर यांच्या कडून सांगण्यात आले. यानिमित सकाळी ७ ते १० गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होमहवन,सकाळी १०.३० ते १२.००नामस्मरण, दुपारी १२.०० ते १.०० महाआरती,दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद,

दुपारी ३.०० ते ५.०० १० वी. व १२ वी. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यरांच्या हस्ते सन्मान समारंभ.सायं. ५.०० ते ८.०० भक्तीमय कार्यक्रम सपन्न झाले.तसेच देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला यावेळी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) गाव समिती (हडपीड देवगड) अध्यक्ष प्रभाकर धाकू राणे, सचिव अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पुरस्कार सन्मानित श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर,खजिनदार ज्ञानेश्वर श्यामसुंदर राऊत आदी उपस्थित होते.