सावंतवाडीत भव्य रक्तदान शिबिर

'जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य
Edited by: विनायक गांवस
Published on: June 12, 2025 19:23 PM
views 66  views

सावंतवाडी : 'रक्तदान श्रेष्ठ दान' या उक्तीला सार्थ ठरवत १४ जून रोजीच्या 'जागतिक रक्तदाता दिना 'चे औचित्य साधून  सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आणि रक्तदाता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग', 'सावंतवाडी तालुका पत्रकार संघ' आणि 'रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी' यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

   

रविवार, १५ जून २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रोटरी हॉल, साधले मेस समोर, सावंतवाडी येथे हे रक्तदान शिबीर पार पडणार आहे. रक्तदानाला 'जीवनदान' मानले जाते आणि या शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

     

रक्ताची गरज नेहमीच असते आणि प्रत्येक रक्तदानाला एका जीव वाचवण्याची संधी मिळते. या सोहळ्यात नियमित रक्तदात्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे, ज्यामुळे इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरणा मिळेल. या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाविषयी जनजागृती वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. सर्व इच्छूक रक्तदात्यांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून या सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.