सिंधुदुर्ग बेलदार भटका समाज संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मारुती मोहीते !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 25, 2024 07:32 AM
views 120  views

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्या जिल्हाध्यक्षपदी वैभववाडीचे मारुती नामदेव मोहीते यांची बिनविरोध निवड झाली. आज संघाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा बेलदार भटका समाज संघाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हा अध्यक्ष पदासाठी एकमुखाने श्री मोहीते यांच्या नावाला सर्वांनी पसंती. श्री. मोहीते यांच्या निवडीनंतर त्यांचं समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर बोलताना श्री.मोहीते म्हणाले, सर्वांना एकत्र घेऊन संघटनेचे काम करणार आहे.तसेच  संघाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करणार आहे.