बांद्यातून विवाहिता बेपत्ता

Edited by: मंगल कामत
Published on: October 17, 2022 20:03 PM
views 670  views

बांदा : बांदा - गडगेवाडी येथील सौ. राजश्री राजेंद्र पडते (५०) ही विवाहिता शनिवार १५ ऑक्टोबर पासून बेपत्ता असल्याची फिर्याद पती राजेंद्र पडते यांनी बांदा पोलीसात दाखल केली आहे. राजश्री या माहेरी जात असल्याचे सांगून शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. मात्र, त्या तळकट येथे माहेरी पोहोचल्या नाहीत असे चौकशीअंती स्पष्ट झाले. अन्य नातेवाइकांकडेही चौकशी केली असता त्या कोठेही आढळून आल्या नाहीत.

       सौ. राजश्री यांच्यावर सावंतवाडी येथे मानसोपचार तज्ञांकडे उपचार सुरु आहेत. त्यांची सर्वत्र शोधाशोध करुन कोठेही न आढळल्याने रविवारी पती राजेंद्र पडते यांनी पत्नी राजश्री या बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. त्या कोणालाही निदर्शनास आल्यास बांदा पोलीसात माहिती द्यावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी केले आहे.