
सावंतवाडी : मळेवाड येथील नवविवाहितेने आपल्या माहेरी न्हावेली येथे काल रात्री आत्महत्या केली. घराशेजारील विहिरीत उडी घेऊन तिने आपलं जीवन संपवल. आज सकाळी हि घटना उघडकीस आली.
अक्षरा अक्षय नाईक (वय 26) असे त्या नवविवाहीतीचे नाव आहे. मळेवाड येथे तीचे सासर असून ती न्हावेली येथे माहेरी आली होती. काल विहीरीत उडी घेत तीन आत्महत्या केली. आज हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी मुळीक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तीचा दोन महिन्यापूर्वी मळेवाड येथील अक्षय नाईक यांच्याशी विवाह झाला होता. तळवडे येथे तीचा टेलरिंगचा व्यवसाय होता. माहेरी असताना तीने हे टोकाच पाऊल का उचलले ? याचा तपास पोलिस घेत आहेत.