
सावंतवाडी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेमध्ये मराठी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ , संस्था कार्याध्यक्ष. नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी सदस्य दीपक जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पुंडलिक ठाकरे, मुख्याध्यापक श्री.फाले , पर्यवेक्षक श्री.कदम तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून विविध कविता, वेडात मराठे वीर दौडले सात हे समुहगीत, गोष्टी तसेच चित्रपट सृष्टीचा इतिहास सांगणारे नृत्य सादर करण्यात आले. शालेय उपक्रम घेण्यात आले.
तसेच प्रशालेचे सहा. शिक्षक श्री.तिवरेकर , श्री.कारिवडेकर ,श्री.बी.बी.सावंतयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे केली. प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. प्रज्ञा मातोंडकर व ऋतुजा सावंतभोसले यांनीही आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सहाय्यक शिक्षिका सौ. प्रज्ञा मातोंडकर, सौ. नेहा गोसावी ग्रंथपाल सतीश राऊळ अभिषेक गावडे तसेच रितेश राऊळ व इयत्ता आठवीच्या व पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.