तळवडेतील सिद्धेश्वर मंदिर 5 हजार दिव्यांनी निघालं उजळून !

जरागेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2023 16:36 PM
views 133  views

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथील सकल मराठा समाज तळवडे यांच्यावतीने मराठा समाज आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व सरकारला जाग आणण्यासाठी  मराठा समाज बांधवांतर्फे तळवडे  येथील ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी पाच हजार दिवे लावण्यात आले. यावेळी मराठा समाज ऐक्यवर्धक संघ मार्फत योग्य नियोजन करण्यात आले होते.


यावेळी मंदिराभोवतीचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. मराठा बांधवातील एकजूट अशीच कायम राहावे व मराठा आरक्षण सरकारकडून मिळावे असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी यावेळी मराठी बांधवांना मार्गदर्शन केले. जर आरक्षण मिळाले तर गोरगरीब मराठी बांधव यांना याचा फायदा होणार आहे असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन पुकारले आहे .त्याला पाठिंबा देण्यासाठी तळवडे गावातील हजारो मराठा बांधव यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी ते आंदोलन सुरू केले आहे त्याला तळवडे येथील मराठी बांधवांतर्फे पूर्ण पाठिंबा देण्यात आला 

      

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा बांधवांतर्फेद या मराठा आरक्षण संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. यातून मराठा बांधव यांची एकजूट दाखवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तळवडे येतील मराठा सकल मराठा समाज तर्फे रॅली काढून सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी यावेळी माहिती तळवडे येथील मराठा समाज ऐक्यवर्धक संघ पदाधिकारी यांनी दिली.