मराठा आरक्षणासाठी लागणारे पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचं आवाहन

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 18, 2023 19:52 PM
views 158  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा - कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार हे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यातील आपल्याकडे असलेले पुरावे २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत विशेष कक्षात सादर करावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.