मराठा समाजाने राजकीय कवचकुंडले बाजूला ठेवून एकत्र यावे : सीताराम गावडे

Edited by: विनायक गावस
Published on: November 05, 2023 12:53 PM
views 70  views

सावंतवाडी : मराठा समाजाने राजकीय कवचकुंडले बाजूला ठेवून फक्त मराठा जात म्हणून एकत्र या, विरोधकांना आपली ताकद दाखवून द्या व मनोज जरांगे पाटील यांना बळ द्या असे आवाहन सावंतवाडी तालुका मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे यांनी माडखोल ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना केले.

माडखोल ग्रामस्थांनी आज शाळेच्या पटांगणात सभेच आयोजन केले होते. यावेळी गावडे बोलत होते. आता गावागावातून उठाव होणे ही काळाची गरज आहे. गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा स्थापन करुन तीथे पदाधिकारी नेमले जातील त्याची सुरवात माडखोल गावातून करु. मराठा बांधवांना लागेल ते सहकार्य केले जाईल फक्त तुम्ही तुमची एकजूट अभेद्य ठेवा असे आवाहन केले.

सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक प्रसाद राऊळ यांनी यापूढे ओपन जागवेर आरक्षित उमेदवार उभा करण्याची कोणत्याच राजकीय पक्षाची हिंमत होता कमा नये. यासाठी दबाव गट तयार करायला हवा असे स्पष्ट करुन मराठा समाजाने कोणावर विसंबून न राहता स्वताचा लढा स्वतःच उभा करायला हवा यासाठी आपली एकी महत्वाची आहे. ती कायम ठेवून एक नवा इतिहास घडवुया असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी बुधवारी सावंतवाडीत होणाऱ्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ठरवले. यावेळी राजन राऊळ,स्वप्निल शिवाजी सावंत ,प्रविण भावाचंद्र राऊळ ,महादेव नारायण धुरी ,रामा साबा धुरी,अजित अंकुश नाईक,खेमा प्रकाश राऊळ,रोशन प्रविण राऊळ,राम दाजी राऊळ, रघुनाथ बाळकूण सावंत,सुभाष कृष्णा देसाई,सचिन संतोष सावंत,राजन बालकृष्ण राऊळ

लक्ष्मण नारायण आडेलकर, न्हानु महादेव राऊळ,नारायण राऊळ मेघनाथ राऊळ, सदाशिव पालव,राजन, विष्णु राऊळ, संजय भिकाजी लाड ,कृष्णा सुमन राऊळ,विजय तुकाराम राऊळ,अमित सदाशिव राऊळ,सुबोध वामन राऊळ,. पाहूरंग झिल राऊळ. सुनिल घोडी सावंत आदी उपस्थित होते.