मराठा समाज बांधवांनी उदयोगाकडे वळावे : प्रकाश गायकवाड

Edited by:
Published on: December 28, 2023 13:22 PM
views 219  views

देवगड : उदयोग व्यवसायाकडे वळून आपली प्रगती साधली पाहिजे,असे मत उद्योजक प्रकाश गायकवाड यांनी देवगड येथील मराठा समाजाच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या वेळी आपले मत व्यक्त केले.

मराठयांचा राजेपणा टिकविण्यासाठी आपली प्रगती साधून समाजाची उन्नती केली पाहिजे. यासाठी युवकांची उदयोग व्यवसायाकडील चळवळ हि तीव्र गतीने असली पाहिजे असे मत उदयोजक प्रकाश गायकवाड यांनी देवगड येथे मराठा समाजाच्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केले.

देवगड वेदा हाटेलमध्ये देवगड तालुका मराठा समाजाच्यावतीने दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदिप साटम,माजी गटविकास अधिकारी आर.जी.सावंत, केदार सावंत, माजी मुख्याध्यापक संजीव राऊत,दयानंद पाटील,मिलिंद माने,माजी मुख्याध्यापक मनोहर भगत,सुर्यकांत पाळेकर,सरपंच संध्या राणे, योगेश राणे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना उदयोजक प्रकाश गायकवाड म्हणाले की, युवकांनी नोकरीकडे नवळता व्यवसाय उदयोग केले पाहिजेत. व्यवसाय उदयोगाच्या माध्यमातून आपली प्रगती साधून समाजाची उन्नती केली पाहिजे. यासाठी आपण आत्मियतेने जिध्द कसोटी व ध्येय हे गुण आत्मसाद करुन उदयोजक बनण्याच्या दृष्टीकोनातून वाटचाल केली पाहिजे.

मराठयांचा राजेपणा टिकविण्यासाठी आपली भुमिका व आपले कर्तुत्व निर्माण केले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा हा मराठा समाजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयामध्ये शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले उभारले आहेत. पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून आज जिल्हयाची प्रगती होत आहे. पर्यटनात्मक व्यवसायातूनही युवकांनी आपली उन्नती साधण्याच्या दृष्टीकोनातून आत्मियतेने प्रयत्न केले पाहिजेत असे मत उदयोजग गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी संदिप साटम्,योगेश राणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उदयोजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते देवगड तालुका मराठा समाजाचे दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार माजी मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी मानले.