मराठा समाज बांधवानी गावागावात शासनाचा निषेध नोंदवावा : सीताराम गावडे

Edited by: विनायक गावस
Published on: September 03, 2023 10:53 AM
views 169  views

सावंतवाडी : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा मराठा समाज बांधवानी रस्त्यावर उतरून निषेध केलाच पाहिजे व आपली एकजूट दाखवली पाहिजे, यासाठी प्रत्येक गावातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत आपल्या गावातील मुख्य चौकात जमून निषेध व्यक्त करावा व लाठीचार्ज चा निषेध करावा असे आवाहन मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

जिल्हा मराठा समाजाने उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे त्यात पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे,मात्र मराठा समाजाने गावागावातून निषेध नोंदवावा,व मराठा समाजाची अभेद्य एकजूट दाखवून देऊन राज्य शासनाला व पोलीस प्रशासनाला आम्ही मोडू पण वाकणार नाही हे दाखवून देऊ असे आवाहन सीताराम गावडे यांनी केले आहे.