
सावंतवाडी : माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे उमाकांत वारंग यांनी जाहीर केले आहे.
माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्यासह सावंतवाडी पालिकेतील तत्कालीन नगरसेवकांनीही उमाकांत वारंग यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी स्वातंत्र्यदिनी गुरुकुल येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात साळगावकर यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, उमेश कोरगावकर, सकल मराठा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते सुंदर गावडे उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्धार केलेला असताना तळकोकणात पहिल्या सकल मराठा समाजाचा उमेदवारानं विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.