प्राथमिक आरोग्य केंद्र परुळेत अनेक पडे रिक्त | मनोहर येरम यांचा उपोषणाचा इशारा

Edited by: दिपेश परब
Published on: August 10, 2023 14:15 PM
views 141  views

वेंगुर्ला : जिल्हा परिषद म्हापण पंचक्रोशीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे कार्यरत आहे. सध्या हे प्राथमिक केंद्रच आजारी झालेले असून त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, परीचारिका, लिपिक, शिपाई इत्यादी बहुसंख्य पदे रिक्त असल्यामुळे तेथे येणाऱ्या रुग्णाला नाहक त्रास होत आहे. त्यातच तेथे असलेले कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता ते कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे देत नाही. यामुळे जर शासनाकडुन या रुग्णांच्या समस्या ११ ऑगस्ट २०२३ पुर्वी निकाली काढून रुग्नांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही तर १५ ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय ओरोस येथे ग्रामस्थांसहित उपोषण करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मनोहर येरम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद म्हापण पंचक्रोशीकरिता परुळे आजारवाडी येथे सन १९६३ पासुन प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे कार्यरत आहे. सध्या हे प्राथमिक केंद्रच आजारी झालेले आहे. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, परीचारिका, लिपिक, शिपाई इत्यादी पदे रिक्त असल्यामुळे तेथे येणाऱ्या रुग्णाला नाहक त्रास होत आहे. तेथे असलेले कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता ते कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे देत नाही. त्याप्रमाणे जे मधुमेह रुग्ण व ज्यांना उच्चदाबाचा त्रास असलेले रुग्ण आहेत अशा रुग्णांना वेळेवर औषधे दिली जात नाही. त्यांना विचारणा केली असता आम्ही मागणी केली आहे. असे सांगितले जाते मात्र आपण मागणी केली आहे तर त्याचा खुलासा दाखवा. असे विचारले असता समाधानकारक उत्तर नसते.

महाराष्ट्र शासन सांगते की, आपला दवाखाना मग आम्हा रुग्णांना प्रश्न पडतो की, खरच हे सरकार रुग्णांचा विचार करते काय? कि नुसती जाहिरात करून रुग्णांची दिशाभूल करते.

जर आपल्या स्तरावर शासनाकडुन रुग्णांनाच्या समस्या ११ ऑगस्ट २०२३ पुर्वी निकाली काढून रुग्नांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही तर मी १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय ओरोस येथे उपोषणास बसणार आहे. व याची जबाबदारी जिल्हा अधिकारी यांची राहीन. असा इशारा देण्यात आला आहे.