केसरकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

Edited by:
Published on: November 18, 2024 15:52 PM
views 190  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग मतदारसंघातील गावागावातून ग्रामस्थ व इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी आणि जनतेच्या मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून उबाठा शिवसेना बॅकफुटवर गेला असल्याचा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी लगावला आहे.

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना चराठा गावडेशेत येथील महिला तसेच मळगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. श्री. केसरकर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. कार्यकर्ते प्रत्येक घराघरात पोहोचत असून धनुष्यबाणाचा प्रचार करीत आहे. यावेळी कार्यकर्त्यांना गावागावातील घरातून लाडकी बहीण, लाडका भाऊ उस्फूर्तपणे प्रतिसाद देत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. श्री. केसरकर यांना अनेक संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे. तसेच उबाठा शिवसेनेतील नेते बाळा गावडेही शिवसेनेत आले आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही उबाठाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणातून बाहेर पडतील असा विश्वास श्री. दळवी यांनी व्यक्त केला. लाडक्या बहिणी महायुतीला शक्ती देण्यासाठी धनुष्यबाणालाच मतदान करणार आहेत असा दावा केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये मळगाव येथील प्रशांत राऊळ, यश मांजरेकर, शिवतेज घारे, दीपेश मांजरेकर, ओमकार चव्हाण, आबा चव्हाण, आर्यन गवळी, तेजस कोलेकर, अंकित शर्मा तसेच चराठा गावडेशेत येथील महिला व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.