तरंदळेतील असंख्य कार्यकर्ते भाजपात

Edited by:
Published on: November 18, 2024 12:18 PM
views 258  views

कणकवली :  कणकवली तालुक्यातील तरंदळे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला असल्याचे सदस्य पूजा जाधव यांनी सांगितले. या प्रवेशामुळे तरंदळे पंचक्रोशीत उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला आहे. पक्ष प्रवेश केलेल्या उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रा. प. सदस्य पूजा जाधव, संतोष कदम, प्रमोद जाधव, प्रणय जाधव, रमेश कदम, उत्तम कदम, उदय कदम, सचिन कदम, विलास जाधव, सुवर्णा जाधव, अनिल जाधव, वैशाली जाधव, प्रज्ञा कदम, अशोक कदम, किरण कदम, उज्वला कांबळे सुयश जाधव, प्रथमेश कदम यांनी प्रवेश केला.

 यावेळी उपस्थित राजू  हिर्लेकर,सुशील कदम सरपंच, सुधीर सावंत माजी सरपंच, राजेश फाटक माजी सरपंच, डॉ. सत्यवान राणे संदेश सावंत बुथ अध्यक्ष, संजय परब बुथ अध्यक्ष, स्नेहा घाडीगावकर ग्रामपंचायत सदस्य, नरेश घाडीगावकर, गणेश मुंबरकर, निखिल घाडीगावकर, कल्पेश सावंत, आदी उपस्थित होते.