मनुज जिंदल रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी

Edited by: मनोज पवार
Published on: October 08, 2025 11:33 AM
views 270  views

रत्तागिरी :  शासनाने मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांची बदली करत त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर केली आहे. ते एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांच्या जागी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

शासन निर्णयानुसार हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करण्यात आले असून, मनुज जिंदल यांनी आपला सध्याचा पदभार अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरित एम. देवेंदर सिंह यांच्याकडून स्वीकारावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.

या आदेशावर अपर मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) व्ही. राधा यांनी स्वाक्षरी केली आहे.  मनुज जिंदल सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नव्या नियुक्तीबद्दल जिल्हयातून अभिनंदन  करण्यात येत आहे.