
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात २६ मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर दि. २७ मे २०२५ रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला असून या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची आणि ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच दि. २८ ते ३० मे २०२५ या कालावधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी
(१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.
(२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
(३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
(४) विजेच्या खांबांपासून लांब रहावे.
(५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
(६) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
(७) धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
(८) वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे.
(९) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी,
१. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
२. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका.
३. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोंताकडून हवामनाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या.
४. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे,अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
५. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढीलक्रमांवर संपर्क साधावा.