फळ पिक विमा योजना पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करा : मनीष दळवी

Edited by: संदीप देसाई
Published on: November 29, 2023 20:26 PM
views 82  views

सिंधुदुर्ग : हवामावर आधारित फळ पिक विमा योजना पोर्टल वरील तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केली. 

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना २०२३ अंतर्गत बँकेमार्फत आंबा व काजू पिकासासाठी विमा भरण्याची कारवाई बँके मार्फत सुरू असून सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करताना पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे विमा उतरण्याची कारवाई पूर्ण होत नाही. परीणामी विमा उतरविणेची अंतिम तारीख जवळ आली असतानाही अपलोडींगची कार्यवाही पूर्ण करता येत नाही दिनांक २५ २६ व २७ नोव्हेंबर रोजी बँकेस सुट्टी असूनही बँक कर्मचारी अपलोडिंग चे कामकाज करण्यासाठी बँकेच्या शाखेत हजर होते. मात्र पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे विमा उतरण्याची कार्यवाही पूर्ण करता आली नाही. तरी याबाबत आपले स्तरावर पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर करणेबाबत सूचना होण्यास विनंती आहे. तसेच विमा हप्ता भरलेल्या सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मदत वाढ मिळण्यास विनंती आहे अशी विनंती एका पत्राद्वारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विभाग सिंधुदुर्ग यांना केली आहे.