
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष तथा होडावडा गावचे सुपुत्र मनीष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होडावडा गावातील अंगणवाडी व मराठी शाळांमध्ये भाजपा ग्राम कमिटी होडावडा व मित्रपरिवार यांचेवतीने शैक्षणिक साहित्य, मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच या निमित्ताने शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी होडावडा उपसरपंच राजबा सावंत, ग्रा प सदस्य अनन्या धावडे, मनीषा जाधव, शैलजा साळगावकर, तालुका कार्यकारणी सदस्य प्रसाद परब तालुका कार्यकारिणी सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी विवेक साळगावकर, राजेश करगुटकर, दिगंबर दळवी, विजय होडावडेकर, मनोहर नाईक, किरण नाईक, राजाराम पावणोजी,विनोद दळवी आदी भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.