
सावंतवाडी : आम्ही फक्त घोषणा करून थांबलो नाही आम्ही स्वतःच्या नफ्यातून काही रक्कम भेट संस्थांना देण्याचा निर्णय घेतला. विकास संस्था सक्षम झाल्या तर खऱ्या अर्थाने शेतकरी सक्षम होणार आहे. जिल्ह्यातील सर्व काजू विकास संस्था मार्फत खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. कॅनिंग सुद्धा संस्थांच्या वतीने व्हावी त्यासाठी गोदाम व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास संस्थांच्या मागे जिल्हा बँक सदैव राहील.जिल्हा बँक म्हणून प्रत्येक पावलावर आम्ही तुमच्या मागे आहोत.केंद्रसरकार विकास संस्थाना आर्थिक केंद्र बिंदू म्हणून पहात आहेत्यानुसार केंद्र सरकार आपलं धोरण तयार करत आहे. आपलं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर यापेक्षा चांगली संधी नाही. अधिकचा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी दोन पाच रुपये देऊन या संस्था उभ्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांचा कणा बनून आपण काम केलं पाहिजे. आपल्याला सहकाराची साखळी मजबूत करायची आहे,असे प्रतिपादन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी सावंतवाडी माझगांव येथे केले.
सावंतवाडी येथील सिध्दिविनायक हॉल, माझगांव येथे रवि वारी प्राथमिक विकास संस्था संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मनिष दळवी बोलत होते. मेळाव्यात व्यासपिठावर जिल्हा बॅकेचे संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रविंद्र मडगांवकर, विद्याधर परब, बँकेचे माजी संचालक गुरूनाथ पेडणेकर, सावंतवाडी ख.वि.संघअध्यश प्रमोद गावडे, जिल्हा बॅकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, क्षेत्र वसुली उपसरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, कर्ज विभाग प्रमुख श्री. के बी.वरक, संगणक संस्था प्रमुख श्री.वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी व्ही एन डोर्लेकर, विकासअधिकारी, संजय डंबे, सौ.सोनाली चव्हाण, सावंतवाडी शाखा व्यवस्थापक अमोल शिंदे, तसेच संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा गौरव करत असताना सर्वच संस्थांनी तसे प्रयत्न करावेत. या उद्देशाने तसेच तालुक्यातील सहकारातील सर्व मंडळी एकत्र येऊन सहकार चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विकास संस्थानी कर्ज वाटप व वसुली अशा सर्वच बाबतीत आघाडीवर राहावे असे आवाहन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी यावेळी केले.
३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जा ची १००टक्के वसुली केल्याबद्दल आरोंदा विकास संस्था, कोलगाव विकास संस्था,रामेश्वर विकास संस्था डेगवे, भावई क्षेत्रपाल विकास संस्था कुणकेरी , आरोस विकास सोसायटी, वाफोली विकास सोसायटी (संस्थास्तरावरही १००टक्के वसुली),सातार्डा विकास सोसायटी,वेर्ले विकास सोसायटी,चराठे विकास सोसायटी,देवसू विकास सोसायटी,चौकुळ विकास सोसायटी,थापेश्वर विकास संस्था,मळेवाड विकास संस्था शरशिंगे विकास संस्था, वेत्ये विकास संस्था,बांदा विकास संस्था, श्री.माउली महिला बहूउद्देशिय औद्यो.सह संस्था न्हावेली, अशा बँक स्तरावर१००टक्के कर्ज पूर्ण फेड केलेल्या १६ विकास संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव याचा सत्कार मनिष दळवी व संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रविंद्र मडगांवकर,विद्याधर परब यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच १०० टक्केच्या जवळपास पोहोचलेल्या विकास संस्थाचे चेअरमन, उपाध्यक्ष, व सचिव व संचालक याचाहि गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मनिष दळवी पुढे म्हणाले की, जिल्हयातील जास्तीतजास्त संस्थानी आपली वसुली हि १०० टक्के करावी यासाठी त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करता यावी यासाठी जिल्हयातील शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थाचा एकत्रित सत्कार समारंभ न ठेवता प्रत्येक तालुक्यात संवाद कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. विकास संस्था या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे त्यामाध्यमातून आपण शेतकऱ्यांना विविध सेवासुविधा उपलब्ध करुन देवू शकतो. विकास संस्थानी त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. विकास संस्थानी फक्त पीक कर्जे शेतकरी यांना न देता अल्प, मध्यम मूदतीची कर्जे देवून त्यातून आपले उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. तसेच खावटी कर्जा संदर्भातही वस्तूस्थिती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तर सुत्रसंचालन राजेश दळवी यांनी केलं.