
देवगड : गुढी पाडव्याची चाहूल लागताच खव्वय्यांना आंब्याचे वेध लागतात.मार्च-एप्रिलपासून स्थानिक बाजारात आंबे येण्यास सुरुवात होतात. देवगड तालुक्यात पाडव्याच्या मुहूर्तावर हेमंत जयप्रकाश मोंडकर यांच्या हापूसआंबा कलम बागेतील ५ डझन ची आंबा पेटी मार्केट मध्ये पाठवण्यात आली आहे.पाडव्याच्या मुहूर्तावर पाठवलेल्या या पाच डझन हापूस आंबा पेटीला ५ ते ६ हजार एवढा दर मिळेल अशी त्यांनी यावेळी आशा व्यक्त केली आहे.
गुढीपाडव्यानंतर काहीसा जर या आंब्याचा सर्वसामान्यांना परवडणार सारखा होतो. सुरुवातीला आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे खव्वय्यांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते.
दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो. मात्र, यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला असून आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे. देवगड हापूस आंबा 1000 ते 1500 पर्यंत आहेत तर पायरी जातीचे आंबे 600 रुपये आहेत.
आंब्याचे मोठे मार्केट असलेल्या मुंबई, पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती. त्याला उच्चांकी दर मिळाला होता. यावर्षी आंब्याला मोहोराने दगा दिला आहे. गेल्या वर्षी देवगड हापूस आंबा हा वाशी मार्केटमध्ये २५००० टन पेक्षा जास्त निर्यात करण्यात आला होता. पण यावेळी उत्पन्नात घट झाल्यामुळे केवळ ३० ते ४० टक्केच आंबा उत्पादन झाले आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही गायब झाला. यामुळे हापूस आंब्याचे दर १४०० ते १५०० असे चढते आहेत. मात्र, मे महिन्यात आंबा ४०० ते ५०० रुपये डझन होण्याची शक्यता आहे.///
साधारण एक महिन्यानंतर कर्नाटकी हापूस, केशर, तोतापुरी, बदामी आंबा बाजारात आल्यावर मात्र देवगड हापूसला दर मिळण्यासाठी धडपड करावी लागेल. फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची आवक बाजारात होऊ लागली आहे. त्यातच रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याची वाट आपण सगळेच पाहतो.सध्या पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये देवगड हापूस आंब्याची आवक वाढताना दिसत आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर आंब्यांची खरेदी केली जाते, पण दरवर्षीच्या तुलनेत यंदाचे उत्पादन आणि आवक कमी असल्यामुळे यावर्षी हापूस आंब्याचे दर चढेच असतील अशी भावना गुलटेकडी मार्केट यार्डातील काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गुढीपाडवा आणि मार्च एंडमुळे सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. यासोबतच यंदाच्या वर्षी हापूस आंब्याचे उत्पादन हे तब्बल २५ टक्केच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे.
यामुळे संपूर्ण हंगामात देवगड मधील हापूस आंब्याचे दर वाढलेले असतील.पण साधारण एक महिन्यानंतर कर्नाटकी हापूस, केशर, तोतापुरी, बदामी आंबा बाजारात आल्यावर हापूसला दर मिळण्यासाठी धडपड करावी लागेल. साधारण तीन आठवडे हापूसची आवक खूपच कमी होती. पण आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची आवक सुरू झाली आहे.
किती आहेत दर ?
ग्राहकांसाठी सध्या हापूसचे दर हे १ हजार रूपयांपासून २ हजार रूपये प्रतिडझन एवढे आहेत. मागच्या वर्षी आवक जास्त होती त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबे हे ७०० ते ८०० रूपये डझनाने मिळत होते. पण यंदा आवक कमी असल्यामुळे दर वाढलेले आहेत. आंब्याच्या वजनानुसार आणि आकारानुसार दर कमी जास्त असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.