
कुडाळ : माणगाव येथील सुप्रसिद्ध श्री दत्त मंदिरात येत्या ३१ जुलै रोजी गणपतीच्या रेखणीची कार्यशाळा होणार आहे. ज्यांना या कार्यशाळेत भाग घ्यावयाचा असेल, त्यांनी दि. २८ जुलैपूर्वी आपली नावे कार्यशाळा घेणारे श्री. सेलेस्तीन शिरोडकर यांच्याकडे नोंदवावीत. ही नावे प्रत्यक्ष भेटून किंवा त्यांचा मोबाईल क्र. ९४०३०९९५४३ यावर नोंदवावीत. नाष्टा, दुपारचे भोजन इ. व्यवस्थेसाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक आहे.
कार्यशाळेत विशेषतः नवशिक्यांनी भाग घ्यावा. कार्यशाळेत येताना रंग साहित्याबरोबरच गणपतीची एक डोकी रंगवून आणावी, म्हणजे अधिक सोपे होईल. प्रात्यक्षिकाबरोबरच प्रत्येकाकडून रेखणी करून घेतली जाईल. साध्या सोप्या पद्धतीने आकर्षक रेखणी (डोळे, नाम इ.) कशी करावी आणि कोणती काळजी घ्यावी याबद्दल सांगून प्रात्यक्षिक देण्यात येईल. या कार्यशाळेची वेळ स. ९.३० ते संध्या. ४ वाजेपर्यंत असेल. कार्यशाळेत कोणालाही प्रवेश असेल. पहिल्या २० जणांनाच प्रवेश मिळेल.
कार्यशाळा घेणारे श्री. शिरोडकर हे एक निवृत्त कलाशिक्षक असून त्यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ रेखणीचे काम सुप्रसिद्ध कै. काका मेस्त्री, साळगाव यांच्याकडे केलेले आहे. नवशिक्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात येईल.