
देवगड : देवगड कोंडामा येथील बाळूमामा देवालय येथे आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ आयोजित हापूस- संकट व संधी हा शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र १०० ते १२० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडला. प्रमुख मार्गदर्शक .सतिश नेने,.राजेश पटवर्धन ,श्री.मुंज,श्री.वायंगणकर संघाचे अध्यक्ष.विलास रूमडे,सचिव .संकेत लब्दे,खजिनदार शुभम चौगुले व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.प्रथम दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तद्नंतर.सतिश नेने यांनी रासायनिक कडून नैसर्गिक व्यवस्थेकडे याचे सखोल मार्गदर्शन केले व सदैव मदतीस उपलब्ध असू असे आश्वासन दिले. त्यानंतर राजेश पटवर्धन यांनी झाडांची शास्त्रोक्त छाटणी कशी करावी व त्यापासून उत्पन्न कसे बदलते याचे विस्तृत मार्गदर्शन केले व ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवय त्यांनी संघाशी संपर्क करावा आपण सदैव उपलब्ध राहू असे आश्वस्त केले. श्री.मुंज व श्री.हेरवाडकर यांनी अनुक्रमे कीडव्यवस्थापन व वित्त व्यवस्थापन यावर आपली मते मांडली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे तडफदार कार्यकारणी सभासद नाना गोडे आणि त्यांचे सहकारी, समशेर खान , इंद्रनील कर्वे व सभासद यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय धुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद परब यांनी केले.