आंबा पिकावरील थ्रिप्सचा प्रादुर्भाव ; नितेश राणेंनी घेतला आढावा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 07, 2024 15:10 PM
views 146  views

देवगड : देवगड येथील आंबा पिकाला थ्रिप्स चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोणतेही कीटकनाशक थ्रिप्स वर परिणाम करत नसून थ्रीप्स  वर आळा बसावा या यासाठी देवगड येथे तातडीने एक कीटक शास्त्रज्ञाची नेमणूक करण्याचे आदेश आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत . 24 तासात हा शास्त्रज्ञ देवगड येथील कृषी कार्यालयात हजर होणार आहे.

आमदार नितेश राणे यांनी याबाबत आंबा बागायतदारांसमवेत तसेच कृषी अधिकाऱ्यांशी आंब्यावरील अनेक समस्यांबाबत संवाद साधला .

आंबा बागायत दारांच्या समस्यांचा आढावा आपण मंत्रालयामध्ये कृषी मंत्री यांच्या समवेत घेऊ. असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले यामध्ये कीटकांपासून उद्भवणाऱ्या रोगांचा समावेश नुकसान भरपाई मध्ये करता येतो का यासाठी प्रयत्न करू तसेच बागायतदारांना नुकसान भरपाई चे निकष जाचक ठरत असून त्यामध्ये प्रादेशिक बदल केले जातील का याचीही चाचपणी करू, देवगड मध्ये असलेली हवामान मापन युनिट वाढवण्यासाठी तातडीने प्रस्ताव द्यावा याबाबतही आपण मंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.

कृषी कर्जावरील व्याजाच्या माफीची ही मागणी यावेळी सर्व बागायतदारांनी केली. आमदार नितेश राणे यांनी सर्व कीटक रोगांवर संशोधन करावे असा सल्ला उपस्थितांना दिला आहे. शेतकऱ्यांना लागणारे  प्रस्ताव आपणाला अवगत करावे असे आमदार नितेश राणे यांनी सर्व कृषी अधिकाऱ्यांना सांगितले आहेत. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, प्रकाश राणे ,सदा ओगले, फळबागायतदार संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य अंबा बागायतदार शेतकरी कृषीचे तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे,सहयोगी संशोधन संचालक गव्हाणकर

वेंगुर्ला डॉ. अजय मुंज शास्त्रज्ञ वेंगुर्ला,डॉक्टर विजय दामोदर रामेश्वर फळ संशोधन केंद्र,विजय राऊत जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी,प्रवीण ओहोळ उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली इत्यादी उपस्थित होते.