गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा पेट्या मार्केटला रवाना

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 29, 2025 17:00 PM
views 465  views

देवगड : देवगड तालुक्यात पाडव्याच्या मुहूर्तावर मनोज प्रभाकर सावंत व महेश सावंत या बंधूंनी यांच्या हापूसआंबा कलम बागेतील ५ डझन ची आंबा पेटी मार्केट मध्ये पाठवण्यात आली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर पाठवलेल्या या पाच डझन हापूस आंबा पेटीला ५ ते ६ हजार एवढा दर मिळेल अशी त्यांनी यावेळी आशा व्यक्त केली आहे.

देवगड  येथील आंबा बागायतदार मनोज सावंत यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंबा पेटी मार्केट मध्ये पाठवली आहे. देवगड वळीवंडे येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार मनोज प्रभाकर सावंत व  महेश सावंत यांच्या यावर्षी च्या सहा डझन हापुस आंब्याच्या पेट्या  पाडव्याच्या मुहूर्तावर मार्केटला रवाना झाल्या आहेत. 

मार्च महिन्यात पाडव्याच्या  मुहूर्तावर हापुस आंब्याच्या पहिल्या पेट्या यावेळी मार्केट ला त्यांनी पाठविल्या आहेत.ते सप्टेंबर ते ऑक्टोंबर नोव्हेंबर काळात त्यांच्या आंबा कलम बागेतील मोहोर त्यांनी मेहनत करून हा मोहोर वाचवला त्यातच अवकाळी पाऊस व थ्रीप्स रोगाच संकट अशी आव्हान पेलून त्यांनी झाडाला आलेला आंबा मोहोर वाचवला.त्यांच्या आंबा बागेत अजून पेट्या आंबा असून पुढील आठवड्यातच हा आंबा मार्केट मध्ये  पाठवण्यात येणार आहे. 

महागडी औषधे त्याच प्रमाणे थ्रीप्स रोगावर औषधांचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आणखीनच मेटाकुलीस आला आहे .अशी त्यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली.बदलत्या हवामाना चा फटका देवगड हापूसला मोठ्या प्रमाणावरती बसतो आहे. अशातच पाडव्याच्या मुहूर्तावर या आंबा पेट्या पाठवण्यात येत असल्यामुळे त्यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.