आंबा कॅनिंगला ५० रु पर्यंत दर द्यावा !

आंबा उत्पादक शेतक-यांची मागणी
Edited by: दीपेश परब
Published on: April 25, 2024 05:13 AM
views 164  views

वेंगुर्ला : सध्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कॅनिंगचा दर २५ रु प्रतिकिलो एवढा मिळत आहे. यामध्ये शेतक-यांचा खर्च ही भरुन येणार नाही. त्यामुळे आंबा कॅनिंगचा दर ५० ते ६० रु प्रतिकिलोने दयावा अन्यथा शेतकरी व शेतकरी संघटनांना याचा पुढील विचार करावा लागेल असा इशारा आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जिल्हा संघटना यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांना दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष  शामसुंदर राय यांनी कृषी अधिकारी हर्षा गुंड यांच्याकडे हे निवेदन दिले आहे. 

   या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे आंबा कॅनिंगच्या हमीभावा संदर्भात शेतकरी लेखी पत्रांव्दारे शासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे मागणी करीत आहे. परंतु यावर कुणीच लक्ष देत नाही.  

      महत्वाची बाब म्हणजे तळकोकणातील व सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबा व काजू उत्पा‍दक शेतकरी पूर्णपणे सातत्यातने होणा-या नैसर्गिक आपत्तीत (थ्रीप्स) व फळमाशी, उष्णता प्रमाण कमी जास्त  होत असल्यामुळे शेतकरी पूर्ण नेटाकुटीस आलेला आहे. जर शेतक-यांचा विचार केला तर वर्षभर आंबा व काजू बागेत मेहनत घेत असतो. जर फळधारणा झाल्यानंतर हाता तोंडाशी आलेले उत्पन्न सातत्याने हिरावून जात असेल तर शेतक‍-यांना आत्मेहत्येशिवाय पर्याय नाही. मुळातच शेतकरी काजू बी हमी भाव बाबत संभ्रमात आहेत. त्या‍तच आंबा उत्परन्नाची या सर्व प्रादुर्भावांमुळे विल्हेआवाट लागत आहे. यातच शेतक-यांचे पूर्ण अर्थकारण पूर्ण कोलमडले आहे. त्यामुळे शेतकरी फवारणीची औषधे त्याचाही खर्च त्यामधून निघणार नाही.            

     गेली ८ ते ९ वर्षे शेतकरी उत्पतन्नाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतक-यांना खर्चाचे कोणतेच ताळमेळ बसत नाही. सदयस्थितीत बघितले तर आंबा सिझन हा मध्यमात येवून ठेपलेला आहे.  कॅनिंगचा दर २५ रु. प्रतिकिलो सुरु आहे. यामध्ये शेतक-यांचा खर्च ही भरुन येणार नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी शासन व लोकप्रतिनिधींकडे विनंती करुन मागणी करीत आहोत की आंबा कॅनिंगचा दर ५० ते ६० रु.प्रति किलो दराने दयावा. न पेक्षा शेतक-यांना व शेतकरी संघटनेला याचा पुढील विचार करावा लागेल. गतवर्षी आंबा उत्पन्न ५% ते १०% सुदधा शेतक-यांना मिळालेले नाही. त्यायचीही नुकसान भरपाई मिळण्याकरीता शेतक-यांनी वेळोवेळी शासन स्तेरावर प्रयत्न केले. परंतु त्यांचा ही विचार झालेला नाही. म्हेणजेच सिंधुदुर्ग जिल्हायातील सर्व सामान्य शेतक-यांवर अन्याय दिसून येत आहे. या सर्व मागणींचा विचार करुन आंबा उत्पादक शेतक-यांना योग्य तो न्याय दयावा. अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी आंबा उत्पादक शेतकरी मेघश्याम भगत, प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, प्रकाश वारंग, उत्तम नाईक, प्रमोद सावंत, रमाकांत परब आदी उपस्थित होते.