बेळगाव महापौरपदी मंगेश पवार तर उपमहापौरपदी वाणी जोशी बिनविरोध

Edited by:
Published on: March 15, 2025 14:51 PM
views 184  views

बेळगाव : सर्वांचे लक्ष लागून राहिलेली बेळगाव महानगर पालिकेची महापौर उपमहापौर पदाची निवडणूक शनिवारी दुपारी पार पडली असुन महापौरपदी प्रभाग क्रमांक ४१ चे नगरसेवक मंगेश पवार तर प्रभाग क्रमांक 44 च्या नगरसेविका वाणी जोशी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

महापौर आणि उपमहापौर दोन्हीही महत्त्वाची पदे शहराच्या दक्षिण मतदार संघाला प्राप्त झाली आहेत. यावरून पुन्हा एकदा आमदार अभय पाटील यांचे महापालिकेवरील वर्चस्व सिद्ध झाले आहे.