
दोडामार्ग : मांगेली तळेवाडी दोडामार्ग सिंधुदुर्ग येथील मांगेली गावाचे सुपुत्र वेदमूर्ती हरिश्चंद्र मालू गवस यांनी 7 एप्रिल 2024 साली संपन्न झालेल्या 39 व्या महाराष्ट्र सेट परीक्षेत, संस्कृत विषयात (Sanskrit Code- 04) 180 गुण 60% घेऊन उत्तीर्ण होऊन प्रावीण्य मिळविले.
सद्यस्थितीत कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय- रामटेक नागपूर येथे व्याकरणविभागात व्याकरण विभागाध्यक्ष आचार्य हरेकृष्ण अगस्ती सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत व्याकरण विषयात (PhD) करीत आहे. तसेच यापूर्वी ही अशाच प्रकारे विविध विषयात सुवर्ण पदके प्राप्त केली असून, आई ,वडील गुरुजनांच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेत आहे. गवस यांची आता वेदमूर्ती म्हणून ओळख होत आहे.