
सावंतवाडी : प्रतिपंढरपूर म्हणुन ओळखल जाणाऱ्या सावंतवाडी येथील श्री विठ्ठल - रखुमाई मंदिरात भक्तांकडून रखुमाईच्या चरणी मंगळसूत्र अर्पण करण्यात आले आहे. हनुमान सावंत यांच्याकडुन आज हे मंगळसूत्र रखुमाईला अर्पण करण्यात आले.
विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठल भक्त श्री व हनुमान सावंत यांच्याकडुन हे मंगळसूत्र अर्पण करण्यात आले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, खजिनदार देवेंद्र नाईक, सेक्रेटरी अँड. सुरेंद्र तुकाराम बांदेकर, साबजी नार्वेकर ,राजन महाडेश्वर, हेमंत केसरकर, बाबुराव डिचोलकर, विनायक मसुरकर ,बाळ बोर्डेकर , रत्नाकर माळी, अनिल भिसे, श्री. पडते, श्री. महाडेश्वर आदींसह विठ्ठल भक्त उपस्थित होते.