
मंडणगड : महाराष्ट्र राज्य महसुल सेवक (कोतवाल) संघटनेने 11 सप्टेंबर 2025 रोजी सुरु केलेल्या राज्यव्यापी आंदोलनात तालुक्यातील कोतवाल संघटना सहभागी झाली आहे. या संदर्भात 18 सप्टेंबर 2025 तालुक्यातील सर्व महसुल सेवकांनी तहसिलदार अक्षय ढाकणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करत 19 सप्टेंबर 2025 पासून काम बंद आंदोलनात सहभागी होत असल्याचे सूचीत केले आहे.
तहसिलदार मंडणगड यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहीतनुसार महाराष्ट्र राज्य महसुल सेवक (कोतवाल) संघटनेच्या माध्यमातून महसुल सेवकांच्या चतुर्थ श्रेणीतील समावेशाच्या मागणी करिता नागपूर येथे 11 सप्टेंबर 2025 बेमुदत काम बंद आंदोलन सुर झाले असून त्या आंदोलनाला रत्नागिरी जिल्हा महसुल सेवक संघटना रत्नागिरी यांच्यावतीने पाठींबा देण्यात आलेला असल्याने मंडणगड तालुका महसुल सेवक संघटना 19 सप्टेंबर 2025 पासून काम बंद आंदोलनात सहभाग होत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर अध्यक्ष अनंत मोरे,उपाध्यक्ष नितीन लोखंडे, सचिव स्वप्निल पवार, सुनिल गमरे, संदीप म्हस्कर, मयुर बाईत, सनि गोपाळ, राहूल महागावकर, बबन गोरे, निकेत मालुसरे, प्रज्ञा साळवी, संदिप सावंत, संतोष धाडवे यांच्या सह्या आहेत.










