
कणकवली : कणकवली बाजरपेठेतील शिमगोत्सवातील मांड उत्सवाला शुक्रवारी १७ पासून प्रारंभ होत आहे.यानिमित्त महापुरुष मित्रमंडळच्या वतीने कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृर्तीप्रित्यर्थ दि. १८ व १९ मार्च रोजी रात्रौ.९ वा. झेंडा चौक, बाजारपेठ कणकवली येथे ‘मांडावरील हास्यकल्लोळ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघासाना अनुक्रमे १० हजार रु., ८ हजार रु.व ६ हजार रु.अशी पारितोषिके तसेच आकर्षक चषक अन्य पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत प्रहसन, विडंबन, विनोद नाटकातील प्रसंग, स्वरचीत विनोदी प्रसंग, निखळ मनोरंजन करणारे विनोद प्रसंग,असे कलाप्रकार सादर करावयाचे आहेत.रसिक प्रेक्षकांसाठी ही हास्य विनोदी आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ अनुभवता येणार आहे.तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रद्युम मुंज (९५४५१२१६१६), सुरज ओरसकर (८८०५४५९०९०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.