वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री मानसीश्वर वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी होत आहे. भगवा झेंडा, केळी, नारळ, पेट्रोमॅक्स बत्ती यापैकी सांगणे केल्याप्रमाणे देवास अर्पण करून आपला नवस पूर्ण करतात. रात्री पार्सेकर द. ना. मंडळाचे नाटक होणार आहे. हे नाटक गॅसबत्तीच्या प्रकाशात होत असते म्हणून या जत्रेला ‘बत्तीची जत्रा’ असेही संबोधले जाते. भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन मानसीश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.