माणसाने प्रत्येक क्षणी नवीन शिकले पाहिजे : डॉक्टर बावधनकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 27, 2024 07:13 AM
views 144  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण केले त्याचबरोबर उत्कृष्ट संचलन केले. यावेळी  देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर केले. तसेच छोट्या छोट्या भाषणातून आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धन्वंतरी क्लिनिक तळेरे येथील डॉक्टर बावधनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी माणसाने प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकले पाहिजे संबोधित केले तसेच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार रुजवले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर  यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला शाळेचे सेक्रेटरी मोहन कावळे,सह सेक्रेटरी राजेंद्र ब्रह्मदंडे ,खजिनदार परवेझ पटेल , संस्थेचे कार्याध्यक्ष रघुवीर, शाळेच्या सीईओ निता शुक्ला व मुख्याध्यापिका नीलम डांगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.