मसुरेतील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मसुरे एज्युकेशन सोसायटीकडून गौरव

Edited by: संदीप देसाई
Published on: March 29, 2026 18:52 PM
views 33  views

मसुरे : मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई  यांच्या वतीने मसुरे येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव मुंबई दादर येथे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब आणि संस्थेचे मुंबईचे सचिव प्रसाद बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये मसुरे सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेचे सर्व नूतन संचालक मंडळ, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेतील विशेष योगदान देणारे सभासद, पदाधिकारी, मसुरे गावातील पत्रकार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय निवडीबाबत आणि उल्लेखनीय कार्य करणारे  मसुरे गावातील ग्रामस्थ या सर्वांचा विशेष सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब आणि संस्थेचे मुंबई कमिटीचे सचिव प्रसाद बागवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा मालवण  तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि मसुरे येथील युवा उद्योजक जयेश दीपक परब यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब म्हणाले मसुरे एज्युकेशन सोसायटी ही संस्था गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तम असे काम करत आहे. मसुरे गावामध्ये शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातही उल्लेखनीय काम करणाऱ्या गावातील ग्रामस्थांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारणारी ही एकमेव शिक्षण संस्था असून या संस्थेचा आम्हा सर्वांना गर्व आहे. यापुढे सुद्धा आपण सर्वांनी एकत्र येऊन ही संस्था अजून नावारूपास येण्यासाठी प्रयत्न करूया.

यावेळी मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेचे सचिव प्रसाद बागवे, उपाध्यक्ष उत्तम राणे, मसुरे लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब,शेखर बागवे विकास बागवे, संजय बागवे, दत्तप्रसाद पेडणेकर,प्रदीप भोगले, मोहन बागवे, राम कृष्ण बागवे, राजन बागवे, विठ्ठल  लाकम,प्रकाश वी.परब, संतोष बागवे, मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत, उद्योजिका राधिका दीपक परब, दिलीप चव्हाण, सौ प्राप्ती बागवे, रमेश परब, नीता सावंत, भीमसेन बागवे, सुरेंद्र कोदे, सूर्यकांत बागवे, हेमंत परब, राजन गो. बागवे आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे संचालक सदस्य आणि मसुरे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे सचिव प्रसाद बागवे यांनी बोलताना सांगितले की यापुढेही ही संस्था शिक्षण क्षेत्रात भरीव असे योगदान देणार असून गावातील गुणवंत विद्यार्थी, गुणवंत पालक, गुणवंत ग्रामस्थ या सर्वांच्या मागे खंबीरपणे उभी असून संस्थेच्या योगदानाबद्दल उपस्थित सर्वांना माहिती दिली. यावेळी मसुरे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रसाद बागवे यांनी आभार राजन परब यांनी मानले.