
मालवण : मालवणात भाजपने उबाठा गटाला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा उबाठा गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर या तिघांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. दरम्यान, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे भाजपात स्वागत केले.
यावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडळ तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.










