धामापूर रस्त्याची चाळण

ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले खड्डे
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 07, 2025 18:32 PM
views 223  views

मालवण : बावखोल आंबेरी मार्गे धामापूर रस्त्याची चाळण झाली असून साईडपट्टी खराब खराब झाली होती. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. साईडपट्टी साफ करणे व खड्डे बुजवण्याचं काम आंबेरी वरची वाडी ग्रामस्थांनी स्वखर्चाने व श्रमदानातून पूर्ण केल आहे.

यावेळी सरपंच मनोज डिचोलकर, सागर राऊत, शेखर राऊत, आप्पा राऊत, बाबाजी राऊत, नितेश राऊत, अभिषेक कांबळी, जयेश तावडे, विजय तावडे, निलेश तावडे, राजण परब, नितीन परब, तन्मय परब, अनिल परब, सुशांत परब, निलेश परब, संदिप कुलकर्णी, नाना राऊत, प्रकाश राऊत, विजय माजरेकर आदी ग्रामस्थ सहभगी झाले होते.