
मालवण : मेढा मौनीनाथ मंदिर ते राजकोट किल्ला आणि राजकोट चांभारकोंड ते राॅक गार्डन हे दोन्ही रस्ते सोलर स्ट्रीटलाईट ने प्रकाशमान होणार आहे. माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या मागणीनुसार भाजप च्या माध्यमातून पालकमंत्री नितेशजी राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर यांनी जिल्हा नियोजन मधून सदर कामास निधी मंजूर करून दिल्याबद्दल गणेश कुशे यांनी मानले विशेष आभार मानले आहेत.
सदरभागातील स्ट्रीटलाईट वारंवार बंद पडते त्यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्याकडे केली होती, त्यानुसार त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. पुढील टप्प्यात राजकोट ते जयगणेश मंदिर ते कचेरी या टप्प्यातील कामाला सुद्धा मंजुरी आणणार, असे गणेश कुशे म्हणाले आहेत.
   
                    
   


 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



               



