
मालवण : मालवण बाजारपेठेत सकाळच्या वेळी चाफी फुलांची विक्री करणारे फुल विक्रेता आणि कुंभारमाठ चव्हाण भरडेवाडी येथील रहिवासी चंद्रकांत वसंत फोंडेकर (65) यांनी अंगणातील चाफ्याच्याच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी दिसून आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा आहे.










