
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 'अमृत दुर्गोत्सव २०२५' अंतर्गत आयोजित गड किल्ले बनविणे उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना आज मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या विशेष कार्यक्रमाला स्वराज्य संघटनेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, प्रमुख पाहुण्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्यासह भाऊ सामंत, महानंदा खानोलकर, शर्वरी पाटकर, पूजा सरकारे, मंदार सरजोशी, यतीन खोत, अंजना सामंत, किशोर खानोलकर, तेजस्विता करंगुटकर, अश्विनी आचरेकर, शांती तोंडवळकर, श्रीकांत मालवणकर, दीपावली पवार, तनु भगत, मिथिल मोर्वेकर, शरद मोरे आदी मान्यवर आणि स्वराज्य संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत वारसा जपला जावा आणि नव्या पिढीला महाराजांच्या कार्याची माहिती मिळावी, या उद्देशाने शासनाने 'अमृत दुर्गोत्सव २०२५' या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला तालुक्यातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माती, दगड आणि कल्पकतेच्या जोरावर शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या, अशी माहिती स्वराज्य संघटनेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी दिली.
या स्तुत्य उपक्रमात सहभागी झालेल्या जयेश तळवडेकर, दुर्वांक परुळेकर, आयुष गावडे, रुद्राक्ष कांदळकर, सर्वेश पाटकर, स्वराज राणे, हरिश्चंद्र परब, अक्षय परब, लक्ष कांदळगावकर, सर्वेश मसुरकर, रणवीर राऊत, गौरेश घाडीगावकर, प्रांजल धुमक, वेदा परुळेकर, सान्विका नाईक, ऋत्वि टिळवे, तनिष्का खोत, प्रज्ञेश मिठबावकर, पार्थ वेंगुर्लेकर, वसंत चव्हाण, दुर्वांक घाडीगावकर, राज राऊत आणि भरड दत्तमंदिर सदस्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.












