
मालवण : आगामी नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक आमदार निलेश राणे व शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण शहर दैवज्ञ भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला शिवसेना शाखाप्रमुख, शिवसेना विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख तसेच सरपंच, उपसरपंच, शिवसेना शहर व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व आजी-माजी प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत व मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.