
मालवण : रानबांबुळी येथे काही दिवसापूर्वी खाजगी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत पावलेल्या वराड येथील गणेश चंद्रकांत घोगळे यांच्या घरी माजी आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देत घोगळे कुटुंबियांचे सांत्वन केले. गणेश हा आभाळमाया गृपमध्ये रक्तदान शिबिरात कार्यरत असणारा सदस्य होता. त्याच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तसेच नांदोस येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेष्ठ शिवसैनिक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप हंजनकर यांचे दोन दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने वैभव नाईक यांनी त्यांच्या नांदोस येथील राहत्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले व कुटुंबियांना धीर दिला.
त्याचप्रमाणे आंगणेवाडी येथील वनिता सतीश आंगणे यांचे देखील अल्पशा आजाराने दोन दिवसापूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील सतीश आंगणे व समीर आंगणे यांची वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आंगणेवाडी येथे उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, रुपेश वर्दम, नाना नेरुरकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत, सुकळवाड विभागप्रमुख विजय पालव, नंदू आंगणे, युवासेना उपविभागप्रमुख आयवान फर्नांडिस उपस्थित होते. नांदोस येथील शाखाप्रमुख राजू गावडे, निवृत्ती मांजरेकर, विलास हंजनकर, बबन माळकर, दीपक आंगणे उपस्थित होते. तसेच वराड येथे युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम, भुषण ढोलम, प्रमोद घोगळे, रुपेश घोगळे, विजय चव्हाण, परेश घोगळे, विलास सुर्वे उपस्थित होते.