
मालवण : नाभिक समाज बांधवांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणून मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांच्या धर्तीवर आपल्या व्यवसायात बदल करायला हवा. युवा पिढीने बदलत्या वातावरणात आपल्यामध्येही विविध कला आत्मसात करून आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये प्रगती साधायला हवी. नाभिक समाज बांधवांच्या सर्वच उपक्रमांमध्ये आपले योगदान राहणार असून श्री देवी भैरवी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी आज येथे केले.
तालुका नाभिक समाजाच्यावतीने श्री भैरवी मंदिरात आज संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नाभिक समाजाच्यावतीने समाज भूषण पुरस्कार पत्रकार मनोज चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासापिठावर नाभिक समाज नेते विजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर, माजी मुख्याध्यापक वामन खोत, अरूण तोडणकर, बाळू नाटेकर, किसन मांजरेकर, राजू बिडये, मंदार लुडबे, महेश सारंग, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, तालुकाध्यक्षा दिपा शिंदे, उपाध्यक्ष संदीप चव्हाण, युवा अध्यक्ष संदीप लाड, कार्याध्यक्ष शुभम लाड, सचिव कांता चव्हाण तसेच इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ॲड. भाऊ चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन कांता चव्हाण यांनी केले.
मी सहा वेळा मालवण पालिकेमध्ये विजयी झालो आहे. आजपर्यंत कधीही पराभव स्विकारलेला नाही. माझ्या यशात नाभिक समाज बांधवांची मोठी साथ आहे. नाभिक समाजातील युवा पिढीच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्यासाठी आपण सदैव तयार असतो. या समाजाचे उपक्रम कौतुकास्पद व समाजहित लक्षात ठेवून केलेले असतात. यामुळे याठिकाणी आपला नेहमीच सहभागी होत असतो, असे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सांगितले.
यावेळी अरविंद चव्हाण स्मरणार्थ चव्हाण कुटुंबिय पुरस्कृत ज्येष्ठ नाभिक बांधव पुरस्कार २०२५ विठ्ठल विष्णू आचरेकर (आचरा), प्रकाश जयवंत चव्हाण (मालवण) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श सलून व्यावसायिक पुरस्कार विजय शिवा चव्हाण (मालवण). आदर्श नाभिक संघटक पुरस्कार जगदीश परशुराम चव्हाण (मसुरे), आदर्श नाभिक संघटन कौशल्य पुरस्कार गणेश बाळू चव्हाण (श्रावण). आदर्श समाज सेवक पुरस्कार संदीप सुभाष चव्हाण (तळगाव), आदर्श नाभिक महिला पुरस्कार प्रज्ञा भाऊ चव्हाण (गोळवण), गितांजली गणेश लाड (कोळंब) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.