खासदार शाहू महाराजांचे ॲड.अमृता मोंडकर यांनी मानले आभार

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 17, 2025 19:38 PM
views 79  views

मालवण :  कोल्हापूर येथे सर्किट खंडपीठाची स्थापना जलद गतीने व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणारे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे सिंधुदुर्ग जिल्हा वकील बार संघटनेच्या सदस्या व नोटरी वकील ॲड. अमृता अरविंद मोंडकर आणि जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी भेट घेऊन आभार मानले.

गेल्या अनेक वर्षांपासून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लोकांसाठी मुंबईला जाण्याचा वेळ व प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी कोल्हापूर येथे सर्किट खंडपीठ व्हावे, अशी जोरदार मागणी होत होती. या मागणीला प्राधान्य देत खासदार शाहू महाराज यांनी विशेष लक्ष घालून पाठपुरावा केला, ज्यामुळे या सर्किट खंडपीठाचे उद्घाटन झाले.

या खंडपीठाचा फायदा केवळ कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांनाच नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होणार आहे. यामुळे न्यायप्रक्रियेतील विलंब कमी होऊन वकील व पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या ऐतिहासिक क्षणी उदघाटन कार्यक्रमादरम्यान ॲड. अमृता अरविंद मोंडकर आणि अरविंद मोंडकर यांनी खासदार शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भूषण खोत आणि इतर सहकारीही उपस्थित होते.