
मालवण : भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत कच्छ कडवा पाटीदार महिला मंडळाच्या वतीने आज येथील पोलीस बांधवांना रक्षाबंधन करण्यात आले.
रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. राखी हा एक केवळ धागा नसून ते बहिणीच्या रक्षणाचे आणि भावाच्या कर्तव्याचे प्रतीक आहे. याच भावनेतून समाजातील नागरिक, महिला भगिनींचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना आज कच्छ कडवा पाटीदार महिला मंडळाच्या वतीने रक्षाबंधन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस हवालदार सुशांत पवार, सुहास पांचाळ, सुरेश सावंत, सुप्रिया पवार, भक्ती शिवलकर, महादेव घागरे आणि इतर पोलीस कर्मचारी तसेच पाटीदार महिला मंडळाच्या उर्मिला पटेल, मीना पटेल, अनु पटेल, बन्सी पटेल, नीता पटेल, मितल पटेल, कोमल पटेल आदी उपस्थित होते.